परभणी : सीएएच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:26 IST2020-01-22T00:25:21+5:302020-01-22T00:26:42+5:30
केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़

परभणी : सीएएच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़
सीएए या कायद्याला जिल्ह्यात विरोध होत आहे़ कायद्याच्या विरोधात मोर्चा, जेलभरो, धरणे आदी आंदोलने करण्यात आली; परंतु, केंद्र शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही़ हा कायदा संविधान विरोधी असून, तो रद्द करावा, अशी मागणी होत आहे़ याच पार्श्वभूमीवर संविधान बचाव तेहरीकच्या वतीने सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे़ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला़ आज दुसºया दिवशीही विविध सामाजिक संघटनाच्या पदाधिकाºयांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला़
महाराष्ट्र बंदचे आवाहन
४दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २४ जानेवारी रोजी या तिन्ही कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे़ या कायद्यांमुळे देश गंभीर आर्थिक संकटातून जात आहे़ त्यामुळे हा बंद पुकारल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ़ धर्मराज चव्हाण, सुमीत जाधव, सिद्धार्थ कांबळे, शेषराव जल्हारे, संपतराव नंद, अशोक वायवळ, के़डी़ चव्हाण, मेजर लहाने आदींनी दिली़