मानवत पालिकेसमोरील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; २ महिलांना अटक, ६ पीडितांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:02 IST2026-03-07T14:01:24+5:302026-03-07T14:02:15+5:30

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मानवतमध्ये कारवाई

Parbhani: Prostitution Racket Busted in Manvat; 2 Women Arrested, 6 Victims Rescued Near Municipal Council | मानवत पालिकेसमोरील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; २ महिलांना अटक, ६ पीडितांची सुटका

मानवत पालिकेसमोरील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; २ महिलांना अटक, ६ पीडितांची सुटका

- मोहन बारहाते 
मानवत (जि.परभणी) :
शहरातील नगरपालिका समोरील सिद्धेश्वर गल्ली भागात सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली तसेच दोन ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

सोनाबाई वसंत शिंदे हिच्या घरी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकाला मिळाली. यावरून सपोनि.गोपी सोनेत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ७:५० ते ९:०० वाजेच्या सुमारास धाड टाकली. या छाप्यात घराची मालकीण सोनाबाई वसंत शिंदे आणि आशा संदेश सोळंके (रा.बिहारी कॉलनी, मानवत) या दोघी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांच्या दोन नोटा आणि काही साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका केली आहे. यामध्ये परभणी, नांदेड, सातारा आणि मुंबई येथील महिलांचा समावेश आहे. या सर्व महिलांना आर्थिक प्रलोभन दाखवून या व्यवसायात ओढले गेले होते.

पोलिस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गोपी सोनेत, सपोनि.संदीप बोरकर, पोउपनि.प्रमोद देवकते, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सातपुते, हिंगलेकर, मालसमिंदर, पठाण, डुकरे आणि सहकाऱ्यांनी केली. या प्रकरणी मानवत ठाण्यात कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सेलू यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.

Web Title : मानवत नगरपालिका के पास वेश्यालय पर छापा; महिलाएं गिरफ्तार, पीड़ित छुड़ाई गईं

Web Summary : मानवत नगरपालिका के पास एक वेश्यालय पर पुलिस ने छापा मारा, जिसमें दो महिलाओं को गिरफ्तार किया गया। वेश्यावृत्ति के लिए मजबूर छह पीड़ितों को छुड़ाया गया। दो ग्राहकों को भी हिरासत में लिया गया। पुलिस के नेतृत्व में यह छापा एक घर के आड़ में चल रहे वेश्यावृत्ति रैकेट पर लक्षित था।

Web Title : Raid on Brothel Near Manvat Municipality; Women Arrested, Victims Rescued

Web Summary : Police raided a brothel near Manvat Municipality, arresting two women. Six victims forced into prostitution were rescued. Two customers were also detained. The raid, led by police, targeted a prostitution ring operating under the guise of a home.