शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पालमच्या शेतकऱ्यांनी फिरवली शेडनेटकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:10 IST

निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): निसर्गाच्या लहरीपणाला कंठाळलेल्या शेतकºयांनी शासनाकडून अनुदानावर संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेटसाठी अर्ज केले होते; मात्र निवड झालेल्या शेतकºयांनी दुष्काळामुळे शेडनेट उभारणीकडे पाठ फिरवली आहे.पालम तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाकडून यावर्षीच्या उद्दिष्टानुसार ६ शेडनेट उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. १२५ शेतकºयांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेटसाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल केले होते.शेतकºयांमध्ये चुरस निर्माण झाल्याने कृषी विभागाने सोडत पद्धतीने शेतकºयांची प्रतीक्षा यादी तयार केली होती. पिकांची पेरणी केल्यानंतर कृषी विभागाने शेतकºयांना शेडनेट उभारणीसाठी पूर्वसंमती दिली. यावर्षी शेडनेट उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. विशेष म्हणजे, दुष्काळामुळे फारसे उत्पादन हाती लागले नाही. शेडनेटसाठी बँकाही कर्ज देत नाहीत. शेडनेट उभारणीसाठी केवळ ६ ते १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.पदरमोड करीत शेतकºयांना अगोदर पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे शासनाची योजना घेण्यापेक्षा त्याकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. पहिल्या टप्प्यात सहा शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यातील तीन जणांनी शेडनेट उभारणी होणार नाही, असे कळविले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील पुढील शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली आहे.यातही कोणीही शेतकरी धजावत नाही. त्यामुळे शासनाची योजना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण आहे.१०० टक्के अनुदान द्या४सध्या पालम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्याच यादीमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामामधील पेरणीवर केलेला खर्च दुष्काळात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकºयांना राज्य शासन व कृषी विभागाने मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या शेडनेट या योजनेवर १०० टक्के अनुदान देऊन प्रत्येक शेतकºयाच्या शेतामध्ये शेडनेटची उभारणी करावी. जेणेकरुन ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी दुष्काळाचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.अनुदानासाठीही माराव्या लागतात चकरा४कृषी विभाग शेतकºयांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असला तरी पालम तालुक्यातील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अनास्थेचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेतकºयांनी एखादी योजना आपल्या शेतात अंमलात आणली तर त्या योजनेसाठी शासनाकडून मिळणाºया अनुदानासाठी शेतकºयांना कमीत कमी सहा महिने कृषी विभागाकडे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे स्वत: जवळील पैशांची गुंतवणूक करुन शासनाकडून मिळणाºया अनुदानासाठी चकरा मारण्यापेक्षा योजनेकडेच पाठ फिरवावी लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी