परभणी : भालेराव यास स्थानबद्ध करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:28 IST2019-01-15T00:27:42+5:302019-01-15T00:28:06+5:30
तालुक्यातील नांदगाव येथील संदीप प्रकाश भालेराव याच्याविरुद्ध एमपीडीए (झोपडपट्टी दादा ) कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २८ डिसेंबर रोजी दिला होता. राज्य शासनाने ७ जानेवारी रोजी हा आदेश कायम ठेवला आहे.

परभणी : भालेराव यास स्थानबद्ध करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील नांदगाव येथील संदीप प्रकाश भालेराव याच्याविरुद्ध एमपीडीए (झोपडपट्टी दादा ) कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २८ डिसेंबर रोजी दिला होता. राज्य शासनाने ७ जानेवारी रोजी हा आदेश कायम ठेवला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, संदीप भालेराव याच्यावर पूर्णा, ताडकळस, नवामोंढा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून करणे, खूनाचा प्रयत्न करणे, हत्याराने दुखापत करणे, मालमत्ता हस्तगत करण्यासाठी दुखापत करणे, वाळू चोरी करणे इ. गंभीर स्वरुपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली; परंतु, या प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पूर्णा येथील पोलीस निरीक्षकांनी संदीप भालेराव याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला. जिल्हा दंडाधिकाºयांनी २९ डिसेंबर रोजी संदीप भालेराव यास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला राज्य शासनानेही ७ जानेवारी रोजी कायम केले आहे. संदीप भालेराव हा सध्या फरार असून त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कायद्यांतर्गत ही तिसरी कारवाई आहे.