परभणी: पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:49 IST2019-03-11T23:49:22+5:302019-03-11T23:49:52+5:30
तालुक्यातील दुर्डी ते मुरुंबा या रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलावरुन एक ट्रॅक्टर ८ फूट खाली कोसळल्याने एक जण ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडली.

परभणी: पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील दुर्डी ते मुरुंबा या रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलावरुन एक ट्रॅक्टर ८ फूट खाली कोसळल्याने एक जण ठार झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास घडली.
सोमवारी सकाळी दुर्डी येथून मुरुंबा रस्त्याने एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता. या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या होत्या. दुर्डी ते मुरुंबा दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या रस्त्यावरील पूल ओलांडत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रॅक्टर ८ फूट खोल पडला. या अपघातात ट्रॅक्टरमधील दीपक अंबादास गवळी (२२ ) याचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक संतोष नारायण कदम (रा.पिंपळगाव कुटे ता.वसमत) हा जखमी झाला आहे. घटनेनंतर ताडकळस पोलीस ठाण्याचे जमादार किशोर कुलकर्णी यांनी पंचनामा केला. मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.