परभणी : आरक्षणासाठी मुस्लिम बांधव सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:17 IST2018-08-11T00:16:55+5:302018-08-11T00:17:48+5:30
शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

परभणी : आरक्षणासाठी मुस्लिम बांधव सरसावले
परभणीत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
परभणी शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मौलाना मुजीब दहलवी, मौलाना अ.रहीम खान, शेख फारुखबाबा, जकियोद्दीन खतीब, हाफेज मुश्ताक, सय्यद युसूफ, शेख निसार, मुफ्ती मुसा हाश्मी, चाँद खान पठाण, अनवर अली शाह, मौलाना जहीर अब्बास कासमी आदींची नावे आहेत.
गंगाखेड येथे जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये मुस्लीम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने मुस्लीम आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जमीयत उलेमाचे हफीज अ. खालेक, मौलाना शेख कलीम, हाफीज स.युसूफ, हाफीज अ.गफार, मौलाना स.वसीम, हाफीज शेख मुश्ताक, हाफीज स.याकूब, हाफीज स.जाकेर, हाफीज सनाउल्ला खान, हाफीज अमीर खान, हाफीज शेख सज्जाद, मुस्तफा खान, स.अलीम राज, स.अजीज गुत्तेदार, फेरोज पठाण, जफर खान, शेख रफीक गुत्तेदार आदींची नावे आहेत.