शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

परभणी महानगरपालिकेची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:43 PM

स्वीकृत सदस्याच्या निवडीवरुन सोमवारी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून अतिक अहमद रहीम अहमद यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने या स्वीकृत सदस्य निवडीला विरोध केला. सदस्यांच्या या गोंधळातच अतिक अहमद यांची निवड जाहीर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वीकृत सदस्याच्या निवडीवरुन सोमवारी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून अतिक अहमद रहीम अहमद यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने या स्वीकृत सदस्य निवडीला विरोध केला. सदस्यांच्या या गोंधळातच अतिक अहमद यांची निवड जाहीर करण्यात आली.येथील बी.रघुनाथ सभागृहात सोमवारी महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर माजूलाला, मनपा आयुक्त रमेश पवार, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेमध्ये एकूण ४३ विषय सभागृहासमोर ठेवले होते. त्यापैकी १९६ क्रमांकाचा विषयानुसार मनपातील नामनिर्देशित सदस्याची निवड करावयाची होती. हा विषय चर्चेला आल्यानंतर महापौर मीनाताई वरपूडकर यांनी या पदासाठी राष्ट्रवादीकडून अतिक अहमद रहीम अहमद यांचे एकमेव नाव आल्याने स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काही नगरसेवकांनी अतिक अहमद यांच्या निवडीस विरोध केला. विरोधी पक्षनेते विजय जामकर यांनी या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या चाँद सुभाना जाकेर अहमद खान यांनी मनपा आयुक्तांना पत्र देऊन इरफान आयुब महंमद यांचे नाव सूचविले आहे; परंतु, या नावास मंजुरी न देता अतिक अहमद रहीम अहमद यांच्या नावाची घोषणा केल्याने आक्षेप घेतला. राकाँचे नगरसेवक थेट स्टेजवर गेल्याने एकच गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहाची शिस्त पाळावी, अशा सूचना करण्यात आल्या. त्यावर विरोधी पक्षनेते विजय जामकर यांनी सभागृहाने चुकीच्या पद्धतीने निवड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांनी सूचविलेल्या नावाचा विचार केला नाही. विशेष म्हणजे राकाँ प्रदेशाध्यक्षांचे यांचे पत्रही सोबत जोडले होते. आयुक्तांनी हा ठराव सभागृहासमोर ठेवणे अपेक्षित होते, असे मत मांडले. त्यावर मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या प्रकरणात आयुक्तांना केवळ स्वीकृत सदस्याची शिफारस करण्याचा अधिकार आहे.स्वीकृत सदस्य निवडीसंदर्भात विधी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरु असताना केवळ एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्याच नावाची शिफारस केली, असे सांगितले आणि या शिफारसीनुसार महापौरांनी अतिक अहमद रफीक अहमद यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. याच गडबडीत महापौरांच्या हस्ते अतिक अहमद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब बुलबुले यांनी ठरावाचे वाचन करण्याची मागणी केली. त्यावरुनही बराचवेळ गोंधळ झाला. अखेर ठरावाचे वाचन झालेच नाही. याच गोंधळात स्वीकृत सदस्याची निवड जाहीर झाली.दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सभागृहात गोंधळ वाढत गेला. ही बाब लक्षात घेऊन महापौर मीनाताई वरपूडकर यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले. अर्ध्या तासानंतर हे कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पुढील विषयांना सुरुवात झाली.त्यामध्ये मनपा अंतर्गत अर्बन आरसीएच प्रोव्हीजन व बालआरोग्य कार्यक्रमातील कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करण्याचा ठराव घेण्यात आला. या विषयावर नगरसेवक अतुल सरोदे यांनी सभागृहाला माहिती विचारली. आरोग्य विभागाचे समन्वयक गजानन जाधव यांनी ही माहिती दिली. या विषयावर विरोधी पक्षनेते विजय जामकर, नगरसेवक सचिन देशमुख, मुकूंद खिल्लारे, बालासाहेब बुलबुले, सुनील देशमुख, एस.एम.अली पाशा, नाजनीन पठाण आदींनी कायमस्वरुपी प्रस्तावास मंजुरी दिली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.त्यात सभागृहनेते भगवान वाघमारे, अली खान, महेबूब खान, गुलमीर खान, अशोक डहाळे, जलालोद्दीन काजी, नागेश सोनपसारे, जयश्री खोबे, बंडू पाचलिंग, डॉ. विद्या पाटील, लियाकत अन्सारी आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला.अंगावर धावून गेल्याने तणाव४स्वीकृत सदस्याच्या निवडीवरुन या सभेत विरोधी पक्षनेते विजय जामकर हे आक्रमक झाले होते. सभा तहकूब केल्यानंतर पुढील सत्रात कामकाज सुरु असताना या सर्व बाबी प्रोसेडिंगवर घेण्याची मागणी त्यांनी केली.४ प्रोसेडिंग लिहून घेत असतानाच झालेल्या वादातून विरोधी पक्षनेते विजय जामकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक इमरान लाला यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इतर नगरसेवकांनी हस्तक्षेप करुन वाद मिटविला.संमित्र कॉलनीतील आरक्षण उठविले४शहरातील खानापूर शिवारातील संमित्र कॉलनीत नागरी वसाहत असून, या भागातील सर्व्हे नं.१६/१ या जागेचे चुकीचे झालेले आरक्षण रद्द करण्याचा ठराव नगरसेविका वनमाला देशमुख यांनी मांडला. त्यास मंगल मुद्गलकर यांनी अनुमोदन दिले. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. संमित्र कॉलनीतील आरक्षणाच्या प्रश्नावर नगरसेविका वनमाला देशमुख यांनी यापूर्वी आंदोलनही केले होते.सर्वसाधारण सभेत या विषयांना दिली मंजुरी४या सर्वसाधारण सभेमध्ये शहरात पाणी वितरण योजना टाक्यांपासून ते नळधारकांपर्यंत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सभागृहाने मंजुरी दिली आहे.४तसेच महापालिकेअंतर्गत ६० बेडचे अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर उभारण्यासाठी जागा व शासनामार्फत निधी उपलब्ध करुन हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या विषयावर चर्चा झाली.४यासाठी १ एकर जागा लागणार असून सुपरमार्केट येथे ही जागा निश्चित करावी, असे आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी सांगितले. त्यावर डॉ.वर्षा खिल्लारे, सुशील कांबळे यांनी कृषीनगर, परसावतनगर परिसरात हेल्पसेंटर द्यावे, असे सुचविले.निवडीनंतर सत्कार४महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी अतिक अहमद रहीम अहमद यांची निवड झाल्यानंतर महापौर मीनाताई वरपूडकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.४या सर्वसाधारण सभेत नगरसेविका डॉ.वर्षा खिल्लारे, बाळासाहेब बुलबुले यांनी पेडगाव रस्त्यासाठी निधीची मागणी केली. त्यावर सभागृहनेते भगवान वाघमारे यांनी पर्यटन विकास निधीत ४ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले असून त्यात समांतर रस्ता म्हणून शासनाकडे मागणी केली असल्याचे सांगितले.सभागृहाचे कामकाज सुरु असताना अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे ही आपली संस्कृती नाही. ज्येष्ठ सदस्यांनी सभागृहाचे प्रोटोकॉल पाळले पाहिजेत. आजच्या सभेत विरोधी पक्षनेते विजय जामकर हे माझ्या अंगावर धावून आले. हा प्रकार निषेधार्ह आहे.-इम्रान लाला, नगरसेवक

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका