परभणी : प्रशासनाने बोलावली भरारी पथकांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:11 IST2019-01-03T00:10:42+5:302019-01-03T00:11:15+5:30
बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़

परभणी : प्रशासनाने बोलावली भरारी पथकांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़
‘राहटी येथील बंधाºयातून पाण्याची चोरी’ या मथळ्याखाली २ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात बैठक बोलावली आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, त्यात जिल्ह्यात अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांनी केलेल्या कारवाईचा आढावाही घेतला जाणार आहे़ पथकांकडून प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले असून, राहटी, पूर्णा कोल्हापुरी बंधाºयाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनाही बैठकीस उपस्थित राहण्याचे सूचित केले आहे़ या बैठकीमध्ये अवैध पाणी उपसा रोखणाºया पथकांच्या अहवालाबरोबरच अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव, चाराटंचाई, वैरण विकास योजना आदी मुद्यांवरही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली़