परभणी : मानवत शहरात ९ दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:05 IST2019-06-13T00:04:49+5:302019-06-13T00:05:11+5:30
शहरातील मोंढा परिसरातील ८ आणि बसस्थानक परिसरातील १ असे ९ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडली़ चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

परभणी : मानवत शहरात ९ दुकाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : शहरातील मोंढा परिसरातील ८ आणि बसस्थानक परिसरातील १ असे ९ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडली़ चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात असलेल्या ८ दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे़ नर्मदा ट्रेडिंग कंपनी, मिलन ट्रेडिंग कंपनी, विठ्ठल ट्रेडिंग कंपनी, पवार ट्रेडिंग कंपनी, पांडूरंग कृषी केंद्र, गणेश किराणा, कैलास बार आणि बसस्थानक परिसरातील महेश किराणा या दुकानांचे शटर वाकून चोरी करण्यात आली़ त्यात महेश किराणा दुकानातील १५ हजार रुपये व इतर दुकानदारांचे एक ते दीड हजार रुपयांपर्यंतची रक्कम चोरीला गेली आहे़ एकाच वेळी ९ दुकानांचे शटर वाकवून चोरी झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून, आठवडी बाजारातूनही मोबाईल चोरी होत आहेत़ पोलीस प्रशासनाने चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे़