परभणी : ३० लाखांचा अपहार; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:01 IST2019-07-29T00:01:07+5:302019-07-29T00:01:48+5:30
तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे.

परभणी : ३० लाखांचा अपहार; दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा(परभणी) : तालुक्यातील ३०६ शेतकऱ्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्या प्रकरणी पूर्ण पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन आरोपींना अटक केली आहे.
शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन संचासाठी पूर्णा येथील कृषी कार्यालयात कुठलाही अर्ज केला नसताना तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील शेतकरी सूर्यभान गंगाधर लोखंडे यांच्या नावे बोगस कागदपत्र तयार करून संच व त्यावरील मिळणारे २४ हजार ९८० रुपयांचे अनुदान परस्पर उचलण्याचा प्रकार मागील वर्षी उघडकीस आला होता.
याप्रकरणी सूर्यभान लोखंडे यांनी परभणी येथील उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. उपविभागीय कृषी अधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी खुपसे यांच्या तक्रारीवरून पूर्ण पोलीस ठाण्यात जून २०१८ मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पूर्ण पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत पवार यांनी तपास केला. या प्ररकरणाच्या खोलात गेल्यानंतर पूर्णा तालुक्यात या योजनेअंतर्गत अशाच पद्धतीने ३०६ शेतकºयांचे कागदपत्रे तयार करून ताडकळस येथील बँकेत बनावट खाते उघडून तब्बल तीस लाख रुपयांचे अनुदान परस्पर लाटल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात कृषी विभाग, बँकेचे अधिकारी, व्यापारी यांचे मोठे रॅकेट असल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींपैकी हरीष वंजे आणि कृषी सहाय्यक श्याम यशमोड यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला होता. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांनी सादर केल्यानंतर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यामुळे २७ जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी हरिष वंजे आणि कृषी सहाय्यक श्याम यशमोड या दोघांना नांदेड येथून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, नितीन वडकर, विष्णू भिसे, यांनी ही कामगिरी केली. शेतकºयांच्या हितासाठी सुरू केलेल्या या योजनेत अपहार झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.