शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

परभणी : खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:20 AM

पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भूमिअभिलेखचे सर्व्हर चालत नसल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भूमिअभिलेखचे सर्व्हर चालत नसल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राज्य शासनाने खरेदी विक्री व्यवहारात गैरप्रकार टाळण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार आॅनलाईन केले आहेत. आॅनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार करीत असताना या प्रणालीत ई- फेरफारही केला जात आहे. त्यामुळे खरेदी विक्री व्यवहारासोबतच आता भूमिअभिलेखवरील सातबारावर झालेल्या व्यवहाराची आॅनलाईन नोंदणी झाल्याशिवाय खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होत नाही. खरेदी विक्रीचे दस्ताऐेवज तयार झाल्यानंतर त्याची लॅन्डरेकॉर्ड साईटवर नोंदणी करण्यात येते. या प्रक्रियेत सुधारणा करीत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.२८ मे रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे सुरू होते. मात्र भूमिअभिलेखचे सर्व्हर डाऊन असल्याने आॅनलाईन सातबारा दिसत नव्हत्या. त्यामुळे शेती खरेदी विक्रीचे व्यवहार झालेच नाहीत. २९ एप्रिल रोजीही अशीच परिस्थिती असल्याने दुसºया दिवशीही व्यवहार झाले नाहीत.२८ मे रोजी शेतीचे व्यवहार करण्यासाठी चार दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल झाले होते. २९ रोजीही शेतकरी कार्यालयात सकाळीच दाखल झाले होते; परंतु, सकाळपासूनच भूमिअभिलेखचे सर्व्हर बंद पडल्याने दोन दिवस व्यवहार झाले नाहीत. त्यामुळे व्यवहारासाठी आलेल्या शेतकºयांना दिवसभर कार्यालयात ताटकळत थांबावे लागले.ई-फेरफार प्रणालीत गोंधळसध्या महसूल विभागात सातबारा आॅनलाईन करण्यासोबतच सर्व सातबारा डिजिटल स्वाक्षरीशी जोडली जात आहेत. त्यासोबतच खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना आॅनलाईन सातबारावर ई-फेरफार सुद्धा त्याचवेळी केले जात आहेत. सर्वच तालुक्याच्या ठिकाणी सातबारा उतारे आॅनलाईन आणि डिजीटल स्वाक्षरी जोडण्याचे काम सुरू असल्याने सर्व्हर डाऊन होत आहे. ई-फेरफारसाठी कार्यरत असलेले एलआर सर्व्हर दोन दिवसांपासून पूर्णत: डाऊन असल्याने महसूल विभागाच्या कामाचा खोळंबा झाला आहे. यासोबतच खरेदी विक्री व्यवहारालाही फटका बसला आहे. हा प्रश्न सुटण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असा अंदाज कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.शेतीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना ई-फेरफार प्रणालीतील एलआर सर्व्हर डाऊन झाल्याने दोन दिवस व्यवहार होऊ शकले नाहीत.-पी.आर. कुरुडेदुय्यम निबंधक, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीRegistrarकुलसचिवInternetइंटरनेट