शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

परभणीत इंटरनेट सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:46 PM

परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरातील बीएसएनएलचीइंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़परभणी जिल्ह्यात बीएसएनएलची इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे़ ब्रॉडबँड इंटरनेट तसेच मोबाईलवरून इंटरनेट वापरले जाते़ खाजगी कंपन्यांनी इंटरनेट सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचविली असताना भारतीय दूर संचार निगमने मात्र आपली सेवा ग्राहकाभिमूख करण्याऐवजी या सेवेत अडथळे वाढविले आहेत़ परभणी शहरासह जिल्हाभरात ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट वापरणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ मोबाईल ग्राहकांची संख्याही अधिक आहे़ मात्र इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय दूर संचार निगमची सेवा कुचकामी ठरत आहे़ वारंवार सेवा विस्कळीत होणे, इंटरनेटची गती कमी होणे असे प्रकार घडत असून, ग्राहक केवळ सेवा मिळत नसल्याने खाजगी कंपन्यांचे इंरटनेट वापरण्यावर भर देत आहेत़येथील भारतीय दूर संचार निगमच्या कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही़ त्यामुळे ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागते़ परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय दूर संचार निगमच्या माध्यमातूनच ब्रॉडबँडची सेवा पुरविली जाते़ ठिक ठिकाणी केबल अंथरून ब्रॉडबँड इंटरनेट पुरविले जात आहे़ असे असताना ही सेवा ग्राहकाभिमूख होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, गुरुवारी सकाळी १० वाजेपासून परभणी शहरातील अनेक भागांमध्ये भारतीय दूर संचार निगमचे इंटरनेट बंद पडले़ त्यामुळे ग्राहकांची कामे खोळंबली़ ही इंटरनेट सेवा कधी पूर्ववत होते, याची प्रतीक्षा करावी लागली़अखेर चार तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत झाली़ भारतीय दूर संचार निगमच्या परभणी कार्यालयाकडे या संदर्भात विचारणा केली असता, नांदेड येथूनच इंटरनेट सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले़व्यावसायिकांना आर्थिक फटकासर्वसाधारणपणे घरगुती वापरासाठी खाजगी कंपन्यांचे इंटरनेट मोबाईलच्या माध्यमातून वापरले जात असले तरी व्यावसायासाठी मात्र भारतीय दूर संचार निगमच्या इंटरनेट सेवेलाच प्राधान्य दिले जाते़ त्यामुळे बीएसएनएलची सेवा वापरणाºया व्यावसायिक ग्राहकांची संख्या अधिक आहे़ ही सेवा ठप्प झाली तर ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते़ त्यामुळे ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटBSNLबीएसएनएल