परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:30 IST2018-12-09T00:29:44+5:302018-12-09T00:30:07+5:30
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली.

परभणीतील घटना:कृषी विभागाच्या गोदामाला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास समोर आली. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच काही वेळातच अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पंचायत समितीचे चार गोदाम आहेत. मागील काही महिन्यांपासून हे चारही गोदाम बंद अवस्थेत आहेत. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गोदामातून धूर येत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. ही माहिती अग्नीशमन विभागाला दिल्यानंतर अग्नीशमन अधिकाºयांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून गोदाम बंद अवस्थेत असून, या गोदामात कृषी विभागाचे भंगार साहित्य, काही शेगड्या, हातपंपांचे पाईप व इतर साहित्य गोदामात होते. हे साहित्य जळून खाक झाले. पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता या ठिकाणी दाखल झाले होते. आगीत झालेल्या नुकसानीची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, येथील गोदामपालाची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. तेव्हापासून या ठिकाणी गोदामपाल कार्यरत नसल्याने गोदाम बंद अवस्थेत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात चार गोदाम आहेत. मागील काही दिवसांपासून ते बंद आहेत. या गोदामात कृषी विभागाच्या बंद पडलेल्या योजनांचे साहित्य असावे.
कृषी विभागाचे अधिकारी याची माहिती घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाही कळविण्यात आले आहे. माहिती एकत्रित झाल्यास घटनेची रितसर पोलीस ठाण्यात नोंद केली जाईल, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी सांगितले.