परभणीत तोतया सैनिकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:32 IST2020-02-25T23:32:17+5:302020-02-25T23:32:36+5:30
येथे सैन्य भरती दरम्यान मिल्ट्री ड्रेस व फोटो वापरुन सैन्य दलाचा अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या एका तोतया मिल्ट्रीमॅनविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

परभणीत तोतया सैनिकावर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथे सैन्य भरती दरम्यान मिल्ट्री ड्रेस व फोटो वापरुन सैन्य दलाचा अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या एका तोतया मिल्ट्रीमॅनविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ ते १३ जानेवारी या काळात सैन्य भरती झाली होती. यावेळी संदीप श्रीराम निकम (रा.काळेश्वर, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) हा मिल्ट्रीचा ड्रेस घालून या भागात फिरत असताना आढळला. त्याची चौकशी करीत असताना तो पळून गेला होता. दरम्यान, या प्रकरणी सैन्य दलातील अधिकारी कर्नल तरुणसिंग एस.जामवाल यांनी औरंगाबाद येथील छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा नोंदवून तो परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्याकडे २५ फेब्रुवारी रोजी वर्ग करण्यात आला आहे. पोनि.आनंद बनसोडे अधिक तपास करीत आहेत.