परभणी : विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:53 IST2018-09-02T00:52:29+5:302018-09-02T00:53:28+5:30

शहरातील महावितरण शाखा कार्यालयात मीटर बसविण्याच्या कारणावरुन दोघांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

Parbhani: Hit the electric employee | परभणी : विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण

परभणी : विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील महावितरण शाखा कार्यालयात मीटर बसविण्याच्या कारणावरुन दोघांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
महावितरणचे कर्मचारी सूर्यकांत कच्छवे (३५) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिंतूर रोडवरील वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयात आरोपी जमीर खान रशीद खान ऊर्फ पप्पु व अखिल काजी या दोघांनी मीटर का बसविले नाही, या कारणावरुन त्यांना थापड बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व काम कसा करतोस असा दम दिला. या प्रकरणी कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खदानीत पडून मुलाचा मृत्यू
परभणी : शहरातील सुभेदारनगर परिसरातील पाण्याने भरलेल्या खदानीत पडून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सुभेदारनगर परिसरात एक खदान असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यात शेख सोहेल शेख शब्बीर (१५, रा.मासूम कॉलनी परभणी) याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

Web Title: Parbhani: Hit the electric employee