परभणी : पीककर्जावरून आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:04 IST2018-06-24T00:53:18+5:302018-06-24T01:04:10+5:30
शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून येत्या आठवडाभरात पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना दिला आहे़

परभणी : पीककर्जावरून आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून येत्या आठवडाभरात पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना दिला आहे़
अलाहाबाद बँकेतून पीक कर्ज दिले जात नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्याकडे केल्या होत्या.या तक्रारींची दखल घेत २३ जून रोजी आ़ डॉ़ पाटील यांनी जिंतूर रोडवरील अलाहाबाद बँकेत जाऊन अधिकाºयांना जाब विचारला. शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता असतानाही नियमावर बोट ठेवत बँकेने आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप केले आहे़ शेतकरी कर्जासाठी चकरा मारीत असताना बँकेचे अधिकारी मात्र दाद देत नसल्याच्या कारणावरून आ़ डॉ़ पाटील यांनी संताप व्यक्त केला. येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून बँक प्रशासनाला शेतकºयांना पीक कर्ज देण्यास भाग पाडू, असा सज्जड इशाराही यावेळी आ़ डॉ़ पाटील यांनी दिला़ यावेळी संदीप झाडे, महेश इंगळे, नाथराव लोंढे, गजानन लोंढे, परमेश्वर यादव, सुरेश जाधव, सरपंच प्रभाकर जैस्वाल, माधव काकडे आदी उपस्थित होते़
पीककर्ज : अडवणूक करू नका
यावेळी बँक अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर आ.डॉ. राहुल पाटील म्हणाले की, गतवर्षी शेतकºयांना समाधानकारक पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकºयांची पीक कर्जासाठी अडवणूक करू नका. शेतकरी सहनशील आहेत; परंतु, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अन्यथा शेतकºयांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शिवसेना शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. याची जाणीव बँकेला असू द्या, असेही यावेळी आ. पाटील म्हणाले.