Parbhani: A hard hit with a four-wheel drive | परभणी : चारचाकीच्या धडकेने कोसळला कठडा

परभणी : चारचाकीच्या धडकेने कोसळला कठडा

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचा कठडा तोडून एक चारचाकी वाहन आत घुसल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे एक वाहन (एम.एच.२२-७०९६) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हे वाहन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची संरक्षक भिंत तोडून आत घुसली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयात फोन करुन क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढली.
घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर तट यांनी पंचनामा केला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Parbhani: A hard hit with a four-wheel drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.