शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: अवकाळी पाऊस अन् गारपिटीने मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:20 IST

जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़गंगाखेड शहरासह परिसरात सायंकाळी ५ वाजता वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली़ सायंकाळी ६ वाजता हलक्या सरळी कोसळल्या़ त्यानंतर महातपुरी, रुमणा, जवळा, सुनेगाव, धारासूर, मैराळ सावंगी आदी भागांत जोरदार पाऊस झाला तर दुसलगाव, खळी, खळी पुनर्वसन, ब्रह्मनाथ वाडी, चिंच टाकळी, गौंडगाव आदी भागात जोरदार गारपीट झाली़ या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, गहू, मका इ. पिकांचे नुकसान झाले आहे़पूर्णा तालुक्यात बुधवारी सायंकाळी ६़३० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली़ चुडावा, एरंडेश्वर, वझूर, कावलगाव, गौर, ताडकळस आदी भागात हा पाऊस सुरू झाला़ त्यानंतर फुलकळस, लिमला इ. भागांत गारपीट झाली़ या गारपिटीमुळे आंब्याच्या कैऱ्या गळून गेल्या असून, इतर पिकांचेही नुकसान झाले आहे़ सोनपेठ तालुक्यातील डिघोळ परिसरातही सायंकाळी ६ च्या सुमारास १० ते १५ मिनिटे गारपीट झाली़ आलेगाव व परिसरात सायकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली़ दिवसभर ढगाळ वातावरण होते़ सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली़ अर्ध्या तासाच्या पावसाने रबी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे़दरम्यान, सेलू शहर व परिसरात मंगळवारी रात्री ९.४५ च्या सुमारास अवकाळी पाऊस सुरु झाला. मेघ गर्जनेसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. रात्री सेलू शहर व परिसरात ८ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद झाली आहे. याशिवाय देऊळगाव मंडळात ३, कुपटा मंडळात ४, वालूर मंडळात २ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात चिकलठाणा महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे ३० मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यात सरासरी ९.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परभणी शहरात २ मि.मी. तर परभणी ग्रामीण महसूल मंडळात ४ मि.मी., पेडगाव मंडळात ५.६० तर जांब मंडळात ५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी २.११ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिंतूर महसूल मंडळात २, सावंगी म्हळसा मंडळात ४, चारठाण्यात ३ तर बामणी मंडळात ५ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी २.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ३ तालुक्यांत सरासरी १.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. शेतात सध्या ज्वारी, गहू काढणीचे काम सुरु आहे. त्यामुळे या पावसामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसणार आहे.चिकलठाणा मंडळात जोरदार पाऊस४सेलू : तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळात मंगळवारी मध्यरात्री १० च्या सुमारास जोरदार पाऊस झाला़ महसूल विभागाकडे याची ३० मिमी नोंद झाली आहे़ चिकलठाणा व परिसरात सध्या रबी हंगामातील ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाची काढणी सुरू आहे़ काही ठिकाणी पिकांची काढणी करून त्याची गंजी रचून ठेवण्यात आली आहे़४मंगळवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अचानक झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेले हे पीक भिजले आहे़ तर शेतामध्ये उभी असलेली ज्वारी व गव्हाचे पीक आडवे झाले आहे़ चिकलठाणा शिवारातील रायपूर, निरवाडी बु़, खु़, वाई, बोध, केमापूर इ. गाव शिवारातील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे़ त्यामुळे या पिकाची प्रतवारी कमी करण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या संदर्भात तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवारी रात्रीच्या पावसाने नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही; परंतु, या अनुषंगाने पाहणी करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले असल्याचे शेवाळे म्हणाले़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या