शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : तीन महिन्यांपासून पाच सीसीटीव्ही कॅमेरे पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:52 IST

जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या परभणी बसस्थानकातील पाच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या परभणी बसस्थानकातील पाच सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी मागील तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राज्य परिवहन महामंडळ ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी दिवस-रात्र तत्पर असल्याचे दाखवूून देत आहे; परंतु, मागील काही वर्षापासून एसटी महामंडळाकडून प्रवाशांना तोकड्या सोयी-सुविधा मिळत आहेत. कधी बस वेळेवर लागत नाही तर कधी बसस्थानकात असुविधांचा भरणा झाल्याने प्रवाशांना नेहमी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील सात आगारांचा समावेश आहे. या सात आगारांपैकी परभणी आगारातून इतर आगारांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न महामंडळाला दिल्या जाते.त्यामुळे या बसस्थानकात प्रवाशांची अधिक ये-जा असते. मागील काही वर्षापूर्वी या बसस्थानकात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे बसस्थानक प्रशासन व बसस्थानकावरील पोलीस चौकी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाने व पोलीस प्रशासनाने संपूर्ण बसस्थानक परिसरात जवळपास १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातूून बसस्थानक परिसरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या बसस्थानकात चोरीच्या घटनांना आळा बसला; परंतु, मागील तीन महिन्यांपासून पोलीस चौकीमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ५ कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंद पडलेले हे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.