परभणी : विहीर अधिग्रहणाचे देयके रखडल्याने लाभार्थ्यांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:17 IST2018-10-19T00:17:16+5:302018-10-19T00:17:43+5:30
तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.

परभणी : विहीर अधिग्रहणाचे देयके रखडल्याने लाभार्थ्यांत संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.
भर उन्हाळ्यात पिकांचे पाणी तोडून गावाची तहान भागविणाऱ्या शेतकºयांच्या नशिबी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात ताळमेळ नसल्याने दोन वर्ष उलटूनही शेतकºयांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत.
प्रशासनाची होणार कसरत
अधिग्रहित केलेल्या स्त्रोतांचे देयके देण्यात आली नाहीत. सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहणासाठी देण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील काळात जलस्त्रोत अधिग्रहित करताना प्रशासनाची दमछाक होण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाई संदर्भात १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पालममध्ये बैठक घेण्यात आली होती. दोन वर्षे उलटूनही अधिग्रहणाचे पैसे देण्यात न आल्याची तक्रार शेतकºयांनी केली. अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने देयके अदा करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. मधूसुदन केंद्रे, आमदार