परभणी : उपोषणार्थ्याला आली भोवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:34 AM2018-04-05T00:34:52+5:302018-04-05T00:34:52+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान एका उपोषणार्थ्याला बुधवारी दुपारी भोवळ आल्याचा प्रकार घडला़ त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे़

Parbhani: The fast tracker came in the groin | परभणी : उपोषणार्थ्याला आली भोवळ

परभणी : उपोषणार्थ्याला आली भोवळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान एका उपोषणार्थ्याला बुधवारी दुपारी भोवळ आल्याचा प्रकार घडला़ त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आंदोलकांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे़
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांचे सहा महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे़ वेळोवेळी मागणी करूनही वेतनाची पूर्तता केली जात नाही़ विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत निधी उपलब्ध आहे़ तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार गटसचिवांच्या वेतनासाठी १ टक्के अनुदान जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले आहे़ असे असतानाही गटसचिवांचे वेतन मात्र थकल्याने गटसचिवांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ दरम्यान, या प्रश्नी दोन्ही जिल्ह्यातील गटसचिवांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे़
या उपोषणार्थींची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही़ उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपोषणार्थीपैकी परभणी, हिंगोली गटसचिव कर्मचारी संघटना पतसंस्थेचे चेअरमन एकनाथ लक्ष्मणराव जाधव (रा़ वडगाव ता़ गंगाखेड) यांना अचानक भोवळ आली़ त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांची प्रकृती आता सुधारत आहे़ या प्रकारानंतरही गटसचिवांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे़
प्रशासनाचे गटसचिवविरोधी धोरण
परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील गटसचिवांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप गटसचिवांनी केला आहे.
परभणी जिल्ह्याला संस्था सक्षमीकरण निधी १ कोटी २० लाख रुपये प्राप्त झाला असून, या निधीतून मागील सहा महिन्याच्या वेतनापैकी तीन महिन्यांचे थकीत वेतन करावे तसेच कर्जमाफीतून आलेल्या ८६ कोटी रुपयांच्या २ टक्के प्रमाणे होणाऱ्या निधीतून सहा महिन्यांच्या चालू वेतनापैकी चार वेतनासाठी लागणारा निधी उभा करुन गटसचिवांच्या वेतनाविषयी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी गटसचिवांनी केली आहे.
परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील गटसचिव तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्याप प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. बुधवारी सकाळी एका गटसचिवाला भोवळ आल्याने गटसचिवांनी प्रशासनाविषयी चांगलाच रोष व्यक्त केला.

Web Title: Parbhani: The fast tracker came in the groin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.