क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:18 PM2024-05-21T14:18:32+5:302024-05-21T14:19:21+5:30

बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राचा एकदम स्टायलिश अवतार पाहायला मिळाला.

Priyanka Chopra stylish look for bulgari event in Rome short haircut diamond necklace was attraction | क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!

क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!

बॉलिवूड ते हॉलिवूड असा डंका गाजवणारी ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच इटली येथील बुल्गारी इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंसाठी तिने केलेला लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. इव्हेंटमधील तिचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. स्टायलिश आऊटफिट, शॉर्ट हेअरकट यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. रात्री उशिरा झालेल्या या इव्हेंटमध्ये  हॉलिवूड अभिनेत्रींसोबत पीसीही भाव खाऊन गेली आहे.

बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राचा एकदम स्टायलिश अवतार पाहायला मिळाला. क्रीम अँड ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये तिने एन्ट्री घेतली. तिच्या शॉर्ट हेअरकटने खास लक्ष वेधलं. तिला हा हेअरकटही खूप शोभून दिसतोय. तसंच तिने गळ्यात अतिशय महागडा डायमंड नेकलेस घातलेला दिसला. सर्पेंटी एटर्ना नेकलेस खूपच आकर्षक दिसत होता. देसी गर्लचा हा परदेशी लूक चांगलाच व्हायरल होतोय. भारतीयांनीही तिच्या या लूकला पसंती दर्शवली आहे.

इटलीतील या बुल्गारी इव्हेंटसाठी प्रियंकासोबतच हॉलिवूड स्टार अॅनी हॅथवे, लियू यीफेई आणि शू क्युई सुद्धा सहभागी झाल्या होत्या. अॅनी हॅथवेही थाय हाय स्लिट व्हाईट ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. या चौघींनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. प्रियंका आणि अॅनीचा एकत्र व्हिडिओही व्हायरल होतोय.

प्रियंतका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्येच शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने आगामी 'हेड्स ऑफ स्टेट' चं शूट पूर्ण केलं. अॅमेझॉन प्राईमवर सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत इदरीस एल्बा आणि जॉन सीना दिसणार आहेत. याशिवाय 'द ब्लफ' सिनेमातही ती झळकणार आहे.

Web Title: Priyanka Chopra stylish look for bulgari event in Rome short haircut diamond necklace was attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.