परभणी : शेततळ्यांची कामे संथ गतीने सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:20 IST2019-05-01T00:19:49+5:302019-05-01T00:20:33+5:30
शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वांकाक्षी योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे संथ गतीने होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

परभणी : शेततळ्यांची कामे संथ गतीने सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वांकाक्षी योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे संथ गतीने होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत दरवर्षी राज्य शासनाकडून कृषी विभागाला उद्दिष्ट देण्यात येते. कृषी विभाग उद्दिष्टानुसार नियोजन करून या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देते. शासनाने मोठ्या थाटामाटात ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली; परंतु, या योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असल्याने बहुतांश लाभार्थी शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवित आहेत. काही शेतकरी या योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल करतात; परंतु, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे या शेतकºयांंना आपला प्रस्ताव मंजूर करून शेततळे खोदण्यासाठी बरेच हेलपाटे कृषी विभागाकडे मारावे लागतात.
त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे कृषी विभागाच्या अधीक्षक अधिकाºयांनी लक्ष देऊन ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत ग्रामीण भागात जनजागृती करून शेवटच्या घटकापर्यंत लाभ द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून होत आहे.