शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: आठ गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:09 IST

पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे ८० टक्के शेतकरी केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असून या शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे आपले गाºहाणे मांडले आहे.पूर्णा तालुक्यातील फुकटगाव, खुजडा, कान्हडखेड, हाटकरवाडी, कान्हेगाव, गणपूर, सुकी, ममदापूर या गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान किसान योजनेंतर्गत २ हजार रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. मात्र याच गावांमधील २० टक्के शेतकºयांच्या खात्यावर या योजनेंतर्गत दोन हप्ते जमा झाले आहेत. बहुतांश शेतकºयांना योजनेच्या अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी उसणवारी करुन पेरण्या केल्या आहेत. पावसाने ताण दिल्याने पिकांची परिस्थिती नाजूक आहे. अनेक भागात पिकांवर किडीचा प्रादूर्भाव होत असल्याने महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहेत.त्यातच शेतकरी अनुदान मिळत नसल्याने या शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकºयांनी पूर्णेच्या तहसीलदारांकडे धाव घेतली असून वरील आठही गावांमधील वंचित शेतकºयांच्या खात्यावर शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पहिला हप्ता जमा करावा, अशी मागणी केली आहे.पावसाची शेतकºयांना प्रतीक्षाएकीकडे अनुदान न मिळाल्याने शेतकºयांमध्ये उदासीनता असतानाच दुसरीकडे निसर्गही साथ देत नसल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत. सद्यस्थितीला पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. मात्र पावसाने १५ दिवसांपासून ताण दिला असून पिके कोमेजून जात आहेत.पोळा सणापूर्वी अनुदान द्याशेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला पोळ्याचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या खरीप हंगामातून शेतकºयांना एकाही पिकातून अद्यापपर्यंत आर्थिक लाभ मिळाला नाही. मूग, उडीद ही पिके कमी कालावधीत हाती येतात. पोळ्यापूर्वी मूग आणि उडदाचे खळे होऊन शेतकºयांना आर्थिक हातभार लागतो. मात्र यावर्षी पावसाअभावी दोन्ही पिकांचे उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे पोळ्याचा सण कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहे. तेव्हा पोळा सणापूर्वी शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर माणिका बोखारे, भीमराव बोखारे, सीताराम बोखारे, बाबुराव बोखारे, गंगाधर बोखारे, मारोती बोखारे, उपसरपंच यशवंत बोखारे आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार