शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

परभणी : २५०० गुंतवणूकदारांना फसविल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:56 IST

गरिमा रियल इस्टेट अ‍ॅन्ड अलाईड आणि गरिमा होम्स अ‍ॅन्ड हाऊसेस लिमिटेड या दोन कंपन्यांनी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गरिमा रियल इस्टेट अ‍ॅन्ड अलाईड आणि गरिमा होम्स अ‍ॅन्ड हाऊसेस लिमिटेड या दोन कंपन्यांनी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.गरिमा या कंपनीच्या वतीने वेगवेगळे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या या तक्रारीवरून बोरी, नवामोंढा आणि पूर्णा या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले असून फसवणुकीचा आकडा १ कोटी रुपयांच्या घरात आहे.तक्रारीनुसार या कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूक रकमेचा परतावा म्हणून दामदुप्पट, दीडपट रक्कम देण्याचे अमिष दाखविण्यात आले. परताव्याच्या किंमतीचे अ‍ॅग्रीमेंट घेऊन महाराष्टÑात कोणत्याही ठिकाणी जागा नावावर करण्यात येईल, असे बॉन्डवर लिहून देण्यात आले. या अमिषामुळे अनेकांनी गुंतवणूक केली; परंतु, मुदत संपल्यानंतरही परतावा किंवा गुंतवणूकदाराच्या नावे प्लॉट दिला नाही. कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊ लागल्या. आतापर्यंत तीन गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखेमार्फत केला जात आहे. तपासामध्ये तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या अडीच हजारांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.गुंतवणूकदारांना पोलिसांचे आवाहन४गरिमा रियल इस्टेट अ‍ॅन्ड अलाईड लिमिटेड व गरिमा होम्स अ‍ॅन्ड हाऊसेस या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही परतावा न मिळाल्याने फसवणूक झालेल्या परभणी येथील गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.४परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील तिसरा मजला रूम नंबर २११ येथील आर्थिक गुन्हा शाखेत १२ नोव्हेंबरपासून तक्रारदारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनीने दिलेला बॉन्ड, आधारकार्डाची सत्यप्रत व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावेत.४२०११ पासून परभणी जिल्ह्यात या दोन्ही कंपन्या कार्यरत होत्या. या कंपन्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे दाखल असून पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळाची माहिती मिळविली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे साक्षीदारांची तपासणी केली जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक जी.बी. दळवी यांंनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाPoliceपोलिसInvestmentगुंतवणूक