परभणी : चारठाणा येथे विद्युत तार घरावर पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:27 IST2019-02-07T00:26:47+5:302019-02-07T00:27:11+5:30
गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

परभणी : चारठाणा येथे विद्युत तार घरावर पडली
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा : गावातील एका घरावरवीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील यात्रा परिसरात राहणारे नारायण गडदे यांच्या घरावर ११ केव्ही वाहिनीची वीज तार तुटून पडली़
यावेळी नारायण गडदे यांची आई व मुलगा हे अंगणात बसले होते़ नशिब बलवत्तर म्हणून ही तार दोन फुट अंतरावर पडली अन् अनर्थ टळला़ चारठाणा गावात विजेच्या तारा जुन्या झाल्या आहेत़ अनेक भागांत या तारा लोंबकळत असून, त्या धोकादाय बनल्या आहेत़ वर्षानुवर्षापासून महावितरणने वीज तारा बदलल्या नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़
दोघांना गमवावा लागला होता जीव
चारठाणा येथील जुन्या वीज तारांमुळे दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना सहा महिन्यांपूर्वीच घडली होती़ चारठाणा गावातून जाणाऱ्या एका ट्रकला लोंबकळणाºया वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोघे मृत्यू पावल्याची घटना घडली होती़ त्यावेळी महावितरणच्या अधिकाºयांनी वीज तारा बदलून देण्याचे आश्वासन दिले़ मात्र आतापर्यंत कुठलीही उपाययोजना झाली नाही़ गावातील विजेच्या तारा आणि लोखंडी पोल ५० ते ६० वर्षापूर्वीचे जुने असल्याने ग्रामस्थांसाठी या वीज तारा धोकादायक ठरत आहेत़