परभणी : दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:36 IST2018-12-22T00:36:03+5:302018-12-22T00:36:11+5:30
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या कारणावरुन दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

परभणी : दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या कारणावरुन दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दुष्काळ निवारण संघर्ष समितीचे प्रमुख कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दिवसभर हे आंदोलन करण्यात आल्यानंतर या संदर्भात प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील १८३ गावे जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राखाली येतात. या प्रकल्पातून पाण्याचे दुसरे रोटेशन देण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिला आहे. मात्र डिग्रस उच्च बंधाºयातील पाणी नांदेडसाठी घेऊन जाण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याची निकृष्ट कामे झाली आहेत. त्याचा शेतकºयांना त्रास होत आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई करावी. रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करुन द्यावा, जनावरांसाठी चारा, पिण्यासाठी पाणी आदींची उलब्धता करुन द्यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.