परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:16 AM2019-05-14T00:16:46+5:302019-05-14T00:17:18+5:30

दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.

Parbhani: Drought relief for residents of Wagala by water tank | परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

परभणी : जलयुक्तच्या बंधाऱ्याने वाघाळा ग्रामस्थांना दिलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): दुष्काळी भागात पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच तालुक्यातील वाघाळा येथे मात्र मे महिन्यातही पाणीपुरवठा करणाºया विहिरीला ६० फुटापर्यंत पाणी आहे. त्यामुळे जलयुक्तच्या तीन बंधाºयामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी उद्भवलाच नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलल्या जात आहे.
पाथरी तालुक्यातील वाघाळा गावची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. गावात ६०० कुटुंब गुण्या-गोविंदाने नांदतात. गावातील कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजनेच्या नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक जुनी विहीर आहे. या विहिरीचे ८७ फूट खोल खोदकाम झालेले आहे. या विहिरीतून गाव परिसरात बांधण्यात आलेल्या ७० हजार लिटरची १ व १ लाख २५ हजार लिटरची दुसरी असे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. चार वर्षापूर्वी वाघाळा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत जलस्त्रोताचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला; परंतु, जलस्त्रोतांचेही पाणी अपुरे पडत असल्याने गावात दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. चार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाव परिसरात ५ सिमेंट बंधारे बांधण्यात आली. ५ पैकी ३ बंधारे पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या बाजूला आहेत. त्याच बरोबर भूजल सर्वेक्षण विभागाकडून याच नाल्यावर ५ रिचार्ज शिप्ट घेण्यात आले. याचा फायदा पाणीपुरवठा करणाºया विहिरींना होऊन पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पाथरी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना वाघाळा ग्रामस्थांना मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दर तिसºया दिवशी नळाद्वारे घरपोच पाणी मिळत असल्याने दुष्काळाच्या दाहकतेची जाणीव सुद्धा झाली नसल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.
जायकवाडीच्या पाण्याचाही फायदा
४वाघाळा गाव परिसरातून जायकवाडीच्या डाव्या कालव्याची वितरिका जाते. याच वितरिकेतून जायकवाडीचे पाणी फेब्रुवारी महिन्यात जलयुक्तच्या बंधाºयात सोडण्यात आले होते.
४बंधाºयात पाणी आल्याने आपोआपच पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दुष्काळतही मूबलक पाणी मिळत आहे. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजनेसोबत गावातील १५ बोअरवेलला भरपूर पाणी आहे.
४त्यामुळे पाणीटंचाईच्या आराखड्यात गावातील कोणतीही कामे प्रस्तावित करण्याची वेळ ग्रामपंचायतीला आलीली नाही.
पूर्वी गावात पाणीटंचाई जानवत होती. ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी भटकंतीही करावी लागत होती. मात्र पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन, जलयुक्त बंधाºयासोबतच जायकवाडीच्या पाण्याचा फायदा झाल्याने गावात ग्रामस्थांना दुष्काळातही मूबलक पाणी मिळत आहे.
अर्चना घुंबरे, सरपंच , वाघाळा

Web Title: Parbhani: Drought relief for residents of Wagala by water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.