शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेल्वे मार्गावर ४० कि.मी.चे दुहेरीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:48 IST

परभणी ते मुदखेड या ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४० कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : परभणी ते मुदखेड या ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४० कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली आहे.मुदखेड ते मनमाड या मार्गावरील परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून हे काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे. परभणी ते मुदखेड हा ८१.४० कि.मी. अंतराचा मार्ग असून २०१२-१३ मध्ये या मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली. ३९०.६० कोटी रुपये खर्चापैकी ३ वर्षामध्ये २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून त्यात यावर्षी ५५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी ते मुदखेड या मार्गापैकी परभणी ते मिरखेल हा १७ कि.मी.चा मार्ग जून २०१७ मध्ये पूर्ण होऊन सध्या वापरात येत आहे. तसेच मुगट ते मुदखेड हा ९.३ कि.मी. चा मार्गही दुहेरीकरण झाला असून १० आॅक्टोबरपासून या मार्गावरुनही वाहतूक सुरु झाली आहे. लिंबगाव- नांदेड- मालटेकडी या १४.१० कि.मी. अंतराच्या दुहेरीकरण मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. १७ आॅक्टोबरपासून हा मार्गही सुरु करण्यात आला आहे. एकूण ८१.४० कि.मी. अंतरापैकी ४०.४ कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला मिरखेल ते लिंबगाव (३०.९० कि.मी.) आणि मालटेकडी ते मुगट (१० कि.मी.) या उर्वरित ४१ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परभणी ते मुदखेड या मार्गाचे पूर्णत: दुहेरीकरण झाल्यानंतर मराठवाड्यातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. सद्यस्थितीला ३५ ते ४० गाड्या एकल मार्गावरुन धावतात. दुहेरीकरणानंतर या गाड्यांची गती वाढणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.विद्युतीकरणाचेही लवकरच काम४परभणी ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासोबतच विद्युतीकरणाचे कामही नांदेड विभागाच्या वतीने घेतले जाणार आहे. हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत जमीन संपादन, केबल कार्य, मोठे आणि छोट्या पुलांचे बांधकाम, रिले रुम्स्, केबीन आदी कामे पूर्ण करण्यात आली असून प्रवाशांसाठी उंच प्लॅटफॉर्म, बँचेस, पाण्याची सुविधा ही कामेही रेल्वेस्थानकावर पूर्ण झाली आहेत. रेल्वे मार्गाशी संबंधित ग्लू जॉर्इंटस्, ट्रेकलाईनिंग आदी कामे बाकी असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे