Parbhani: District schools closed for various demands including grants | परभणी : अनुदानासह विविध मागणीसाठी जिल्ह्यातील शाळांनी ठेवला बंद

परभणी : अनुदानासह विविध मागणीसाठी जिल्ह्यातील शाळांनी ठेवला बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात सोमवारी शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. अनुदानाच्या प्रश्नावर प्रशासनाला निवेदन देऊन शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली.
नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात शाळा-शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने २६ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार जिल्ह्यातील शाळांनी दिवसभर बंद पाळला. २०१२-१३ मध्ये देण्यात आलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील ५ हजार ९७३ नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना शासन नियमाप्रमाणे चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर टप्पा अनुदान देण्याचे निश्चित झाले होते; परंतु, अद्यापही शासन हे अनुदान देत नाही. त्यामुळे सोमवारी शाळा बंद ठेवून प्रशासनासमोर हा प्रश्न मांडण्यात आला. या आंदोलनाला १०० टक्के प्रतिपाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यात शिक्षक संघटनांच्या वतीने शाळा बंद आंदोलन करण्यात आले. उर्दू शिक्षक संघटनेने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, राज्यातील अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना अनुदानित करावे, विना अनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा आरक्षण द्यावे, २०१२-१३ च्या वर्ग तुकड्यांचे मूल्यांकन करुन निधीसह घोषित करावे इ. मागण्या करण्यात आल्या. मुक्टा उर्दू शिक्षक संघटना तसेच मुक्टा शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. निवेदनावर एम.ए. रिझवान, सय्यद जमील उर रहेमान, शाहीद खादरी, शफी इनामदार, मुजाहेद सिद्दीकी आदींच्या स्वाक्षºया आहेत.
अघोषित शिक्षक समिती
४अंशत: अघोषित व विना अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्यांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अघोषित शिक्षक समितीनेही आंदोलनात सहभाग नोंदविला.
४समितीचे विभागीय अध्यक्ष गोपाळ गोरे, रामेश्वर काळे, शिवाजी कदम, सतीश जांभळे, अमितराव सोळंके, आनंदराव देशमुख आदींनी या प्रश्नी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
पूर्णेत उत्स्फूर्त प्रतिसाद
४शाळा बंद आंदोलनाला पूर्णा शहरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील ३२ खाजगी संस्थांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सोमवारी शहरातील खाजगी शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.
४सेलू शहरातही आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला. शहर व तालुक्यातील शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. निवेदनावर धनंजय भागवत, एस.एस.मगर, पी.के.तेलगोटे, ए.जी.लोहकरे, एन.पी.डाखोरे, ए.बी.पवार, आर.ए.कदम, एस.व्ही.खरात आदींची नावे आहेत.

Web Title: Parbhani: District schools closed for various demands including grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.