परभणी : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:11 IST2019-06-08T00:10:27+5:302019-06-08T00:11:44+5:30
येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले.

परभणी : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले.
तहसीलदार विद्याचरण कडावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी कांतराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून मेघाताई देशमुख, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे, डॉ. विक्रम पाटील, डॉ.सुभाष कदम, कल्याण देशमुख, नितीन लोहट, रामेश्वर आवरगंड, संजय चव्हाण, कल्याण लोहट, नंदा कुºहे, मीनाक्षी पाटील, सुनीता चापके, प्रा. कल्याण देशमुख, टी.डी. भराड, नवनाथ जाधव, नरहरी वाघ, बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती. संकल्प स्वराज्य फाऊंडेशनकडून अनेक सामाजिक उपक्रम गेल्या काही दिवसांपासूून राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले. फाऊंडशनचे अध्यक्ष श्यामसुंदर निरस यांनी प्रास्ताविक केले. सुभाष ढगे यांनी सूत्रसंचालन केले. फाऊंडेशनचे सचिव विलास साखरे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कोमल गावंडे, संतोष शिंदे, सतीश शिंदे, प्रभाकर कानकुडकेवाड, दत्ता गुरले, सखाराम रनेर, सुनिल केरवाडीकर यांनी प्रयत्न केले.
शिवराज्याभिषेक दिन साजरा
परभणी : शहरातील मोरया मित्रमंडळाच्या वतीने जिजामाता रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अक्षय देशमुख, सुरेश चांदणे, गणेश मुळे, संजय वाळवंटे, मुंजाजी शेळके, यशोदीप नाईकवाडे, अमोल देशमुख, प्रमोद नाईकवाडे, वैभव पिसाळ, भास्कर नाईकवाडे, अमोल कदम, रुस्तूम नाईकवाडे, दीपक शिंदे, महेश लंगोटे, महेंद्र लांबाडे, रणजित बनसोडे, लक्ष्मण बोबडे, युशू खुणे, संतोष जल्हारे, राहुल नवघरे, अक्षय राऊत, संतोष झंवर, आकाश कदम, श्रीकांत नाईकवाडे, कृष्णा नाईकवाडे, वैभव पावडे, शंकर मुळे, सचिन नाईकवाडे, अविराज पावडे आदींची उपस्थिती होती.