परभणी : चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:38 IST2019-01-22T00:37:23+5:302019-01-22T00:38:09+5:30

शहरातील बँक कॉलनी भागात मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या चोरी प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी मंठा येथून ताब्यात घेतले आहेत.

Parbhani: Detained accused in the theft case | परभणी : चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

परभणी : चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील बँक कॉलनी भागात मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या चोरी प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी मंठा येथून ताब्यात घेतले आहेत.
बँक कॉलनीतील रमेश मुंजाजी बागल यांच्या घरात १३ आॅगस्ट २०१८ रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम, नोकिया कंपनीचा मोबाईल, एक घड्याळ असा १९ हजार ५२० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सायबरसेलच्या तांत्रिक मदतीने करण्यात आला. घटनेतील आरोपी हा मंठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी मंठा येथील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून आरोपी शेख सोहेल शेख मेहबूब (रा.जवाहर कॉलनी मंठा) यास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, मधुकर पवार, शरद मुलगीर, शिवा धुळगुंडे, शाम काळे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, संतोष व्यवहारे, रवींद्र भूमकर यांनीही कारवाई केली.

Web Title: Parbhani: Detained accused in the theft case