परभणी : विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:58 IST2018-10-28T00:57:13+5:302018-10-28T00:58:43+5:30
जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथे विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

परभणी : विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथे विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
निलेश राठोड असे मयत युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २६ आॅक्टोबर रोजी सकाळी निलेश राठोड हा गणेशनगर तांडा परिसरातील शेतात कामासाठी गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचे वडील ज्ञानदेव राठोड हे जेवणाचा डबा घेऊन शेतात आले तेव्हा त्यांना गणेश दिसला नाही. त्यामुळे ज्ञानदेव राठोड यांनी त्याचा शोध घेतला असता शेतातील विहिरीच्या पाण्यात हालचाल होताना त्यांच्या निदर्शनास आली. शेजाऱ्यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला तेव्हा निलेश राठोड मिळून आला. त्याला तत्काळ येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू
४परभणी : धावत्या रेल्वेखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पिंगळी ते परभणी या दरम्यानच्या रेल्वेमार्गावरुन एक मालगाडी परभणीकडे येत असताना साधारणत: ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मालगाडीच्या पायलटने वॉकीटॉकीवरुन परभणी येथील उप रेल्वेस्टेशन मास्तर विवेककुमार सिकंदर यांना दिली. त्यानंतर विवेककुमार यांनी नवा मोंढा पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. पोलीस नायक नरोजी रणमाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.