परभणी: वालूर येथील जवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:02 IST2019-03-25T00:02:11+5:302019-03-25T00:02:26+5:30
येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

परभणी: वालूर येथील जवानाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वालूर (परभणी): येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वालूर येथील दीपक मुरलीधर बियाणी हे भारतीय सैन्य दलातील सिकंदराबाद येथील वनइलेक्ट्रीक मॅकेनिकल केंद्रात सेवेत होते. २३ मार्च रोजी सकाळी ९.४० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दीपक बियाणी यांचे शालेय शिक्षण वालूर येथील जि.प.शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर २००२ मध्ये इलेक्ट्रीकल मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून ते सिकंदराबाद येथे भारतीय सैन्यदलात रुजू झाले. १७ वर्षे त्यांनी देशसेवा केली. त्यांचे कुटुंबिय परभणी शहरातील धनलक्ष्मीनगर येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सेवेचे अखेरचे तीन महिने शिल्लक होते. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. परभणी येथील स्मशानभूमीत रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदल व परभणी पोलिसांच्या वतीने शहीद दीपक बियाणी यांना सलामी देण्यात आली. दीपक बियाणी यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षांचा एक मुलगा, एक मुलगी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी परभणीसह वालूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.