परभणी: देवदर्शनाला गेलेल्या दाम्पत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:28 IST2019-03-10T23:27:08+5:302019-03-10T23:28:16+5:30
देवदर्शनासाठी मथुरा येथे गेलेल्या दाम्पत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.

परभणी: देवदर्शनाला गेलेल्या दाम्पत्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देवदर्शनासाठी मथुरा येथे गेलेल्या दाम्पत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली.
येथील कारेगावरोडवरील गजानननगरातील जनार्दन मोदी (७०) हे त्यांची पत्नी मनोरमा जनार्दन मोदी (६५) यांच्यासमोत गोकुळ वृंदावन दर्शनासाठी गेले होते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मथुरा येथे मुक्कामी असताना दोघांचेही निधन झाले. जनार्दन मोदी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर मनोरमा मोदी यांचाही मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ६ वाजता जनार्दन व मनोरमा मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात गजानन, डॉ.लक्ष्मीकांत ही दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनोरमा मोदी ह्या पत्रकार प्रदीप कोकडवार यांच्या त्या मावस बहीण होत.