परभणी : वादळाने फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:45 IST2018-06-02T00:45:02+5:302018-06-02T00:45:02+5:30
तालुक्यासह परभणी शहरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने फळबागांचे नुकसान होऊन घरावरची पत्रे उडून गेल्याची घटना घडली.

परभणी : वादळाने फळबागांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यासह परभणी शहरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने फळबागांचे नुकसान होऊन घरावरची पत्रे उडून गेल्याची घटना घडली.
परभणी तालुक्यातील आर्वी, शहापूर व कुंभारी परिसरात ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह पावसास सुरुवात झाली. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या फळबागांना मोठा फटका बसला. आर्वी येथील सुरेश अश्रोबा कदम यांच्या शेतातील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच टाकळी कुंभकर्ण शिवारात असलेल्या शहापूर येथील एका शेतकºयाच्या फळ बागांचे नुकसान झाले. या नुकसानीचा शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे यांनी प्रत्यक्ष जावून पंचनामा केला. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वादळी वाºयाने अनेक झाडे उन्मळून पडली होती. झाडाखाली उभ्या असलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. तसेच शहरातील संत गाडगेबाबा नगरातील सूमनबाई किसन सदर यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले. तसेच सूमनबाई सदर यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना घडली. परभणी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये घरावरची पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयासह पावसामुळे तालुक्यात १० तास वीज गूल होती.
बोरीत १८ तास वीज गायब
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस झाल्याने महावितरणचे विद्युत पोल उखडून पडले. यामुळे बोरी उपकेंद्रांतर्गत असलेल्या ४० गावांचा वीज पुरवठा १८ तास बंद होता. शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या पावसामुळे उकाडा वाढला असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तसेच बोरी व परिसरात वादळी वाºयामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा महसूल प्रशासनाने पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.
नाथरा, उमरा येथील घरांवरील पत्रे उडाले
पाथरी- तालुक्यातील नाथरा व उमरा गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयासह पाऊस झाला. यावेळी झालेल्या वाºयामुळे गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. तर मोठ मोठी वृक्ष उन्मळून पडली. त्याच बरोबर महावितरण कंपनीचे ८ विद्युत खांबही कोसळून पडले आहेत. गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. उमरा येथील अनेक घरांवरील पत्रे उडून झाडे कोळसली आहेत.