५००० डॉलर विद्यार्थ्याला परत दिले! अमेरिकेच्या कन्सलटन्सीची मुजोरी परभणी सायबर सेलने मोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:33 IST2026-02-27T13:31:46+5:302026-02-27T13:33:40+5:30

हायब्रीड शिक्षणाचे नावाखाली केली फसवेगिरी; परभणीच्या युवकाचे अमेरिकेतील शिक्षण संस्थेत अडकलेले ५ लाख सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले

Parbhani Cyber Police Recover Rs 5 Lakh from US University Consultancy for Student | ५००० डॉलर विद्यार्थ्याला परत दिले! अमेरिकेच्या कन्सलटन्सीची मुजोरी परभणी सायबर सेलने मोडली

५००० डॉलर विद्यार्थ्याला परत दिले! अमेरिकेच्या कन्सलटन्सीची मुजोरी परभणी सायबर सेलने मोडली

परभणी : शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील एका २५ वर्षीय युवकाने हायब्रीड पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये advoy consultancy मार्फत अमेरीकेतील एका विद्यापीठाकडे अर्ज करुन प्रवेश निश्चित केला. परंतू  advoy consultancy यांना हायब्रीड एज्युकेशनसाठी ऍडमिशन बाबत बोलणी झालेली असताना युनिव्हर्सिटी यांनी ऍडमिशन कम्पल्सरी/ रेग्युलर ऍडमिशन घ्यावे लागेल असे त्यांना ते तेथे गेल्यानंतर कळवले. ही बाब लक्षात घेता त्यांनी दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर एक वर्षापासून केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून विद्यार्थ्यांला पैसे परत मिळाले आहेत.

शहरातील काद्राबाद प्लॉट येथील सय्यद आसिम रऊफ यांनी डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिका (यूएसए) येथील केन्सेस राज्य मेसुरी येथे एम. एस. बिझनेस अनेलेटीक्सचे शिक्षण घेण्यासाठी एडवाय या कन्सलटन्सीचे मार्फत अर्ज केला होता. याकरीता त्यांनी ५ हजार यूएस डॉलर (४ लाख ३३ हजार रूपये) ऑनलाईन पध्दतीने पाठविले होते. हे पैसे त्यांनी एडवाय या कन्सलटन्सीचे मार्फत प्राप्त झालेल्या लिंकद्वारे अविला युनिर्वसिटी केन्सेस राज्य मेसुरी यांच्या बँक खात्यावर पाठविले होते. ही रक्कम सय्यद आसिम यांच्या खात्यावरुन विद्यापीठाच्या खात्यावर वर्ग झाली होती.

दरम्यान, ही प्रक्रिया होत असतांना कन्सलटन्सीने कोणतेही काम केले नाही. या संदर्भात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतली. कन्सलटन्सी ज्या महाविद्यालयात सय्यद आसिम यांना प्रवेश देण्यास इच्छुक होती त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश नको होता. यावरून आसिम यांनी प्रवेशासाठी पाठवलेली रक्कम परत देण्याची मागणी केली असता त्यांनी रिटन फ्लाईट तिकीटाची माहिती विचारून त्याच वेळी तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत देतो, असे सांगितले. त्यांनी सर्व प्रक्रिया करूनही त्यांना पैसे परत मिळाले नव्हते. त्यानंतर तीन महिने त्यांनी पाठपुरावा केला. शेवटी एप्रिल २०२५ मध्ये सय्यद आसिम यांनी सर्व कागदपत्रांसह या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय सायबर सेलकडे तक्रार केली. तक्रारीनंतर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे, पोउपनि आदित्य लाकुळे व सायबर सेलचे पथकाने सबंधीत कन्सलटन्सीकडे वारंवार पाठपुरावा केला. या प्रकरणाची माहिती देत दाखल तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल सांगून विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्यास सांगितले. यावर सुरूवातील कोणतेही उत्तर न देणाऱ्या कन्सलटन्सीने काही दिवसांपूर्वी पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले. विद्यापीठाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी कन्सलटन्सीने विद्यार्थ्यांचे पाच हजार डॉलर परत केले आहेत. सायबर सेलकडून तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने करण्यात आलेल्या कारवाईने सदर पैसे परत मिळाले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे, पोउपनि आदित्य लाकुळे, अंमलदार बालाजी रेड्डी,  हेडकाँन्स्टेबल गणेश कौटकर, मोहम्मद शारेख, स्वप्नील पोतदार, सय्यद हिना, रजवी मुर्तुजा यांनी केली.

Web Title : परभणी साइबर सेल ने छात्र के लिए कंसल्टेंसी से 5000 डॉलर वसूले।

Web Summary : परभणी के एक छात्र को साइबर सेल के हस्तक्षेप के बाद 5000 डॉलर वापस मिले। कंसल्टेंसी हाइब्रिड शिक्षा देने में विफल रही, जिसके कारण एक साल के प्रयास और पुलिस कार्रवाई के बाद धनवापसी हुई।

Web Title : Parbhani Cyber Cell Recovers $5000 for Student from Consultancy.

Web Summary : A Parbhani student got back $5000 after cyber cell intervention. The consultancy failed to deliver on promised hybrid education, leading to the refund after a year-long effort and police action.