रात्रीचा फायदा घेत दुचाकीवरून चालली होती गांजाची तस्करी! परभणीच्या दोघांना रंगेहात पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:23 IST2026-02-27T19:22:57+5:302026-02-27T19:23:26+5:30

जळगाव-परभणी गांजा तस्करीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखा व चारठाणा पोलिसांची कारवाई

Parbhani Crime: Two Arrested with 5.5 kg Ganja Near Charthana; Local Crime Branch Busted Smuggling | रात्रीचा फायदा घेत दुचाकीवरून चालली होती गांजाची तस्करी! परभणीच्या दोघांना रंगेहात पकडलं

रात्रीचा फायदा घेत दुचाकीवरून चालली होती गांजाची तस्करी! परभणीच्या दोघांना रंगेहात पकडलं

चारठाणा (जि.परभणी) : चारठाणा ठाणे हद्दीतील पिंपरी शिवारात दोन इसम दुचाकीवरून बेकायदा विक्रीसाठी गांजा घेऊन जात असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरूवारी रात्री ९:३० च्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरूध्द चारठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात दुचाकीसह गांजा असा एक लाख ६० हजार २०० रुपयांचा मुद्दे्माल ताब्यात घेतला.

जळगाव येथून परभणीकडे अवैध मार्गाने गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व चारठाणा पोलीसांना मिळाली होती. पोलिस पथकाने पिंपरी शिवारात सापळा रचला. ज्ञानेश्वर संतोष मोहिते (रा.दर्गा रोड, परभणी) व शेख सोहेल शेख बाबू (रा.काद्राबाद प्लॉट, परभणी) हे दोघे जळगाव येथून परभणीकडे दुचाकी क्रंमाक (एमएच २२ एझेड ४८१२) वरून ५ किलो ५१० ग्राम गांजा किंमत १ लाख १० हजार २०० रूपयाचा मुद्देमाल घेऊन जाताना पोलिसांना आढळून आले. दरम्यान, पोलीसांनी गांजा व ५० हजार किंमतीची दुचाकी असा एकुण १ लाख ६० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

नमुद दोघांविरूध्द चारठाणा ठाण्यात एनडीपीएस अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपीना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. विवेकानंद पाटील, सपोनि. श्रीधर जगताप, चारठाणा ठाण्याचे सपोनि.मुंजाजी दळवे यांच्या पथकातील मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, डुकरे, तुपसुंदर, सातपुते, बुधवंत, चाटे, हनवते, डुबे यांनी केली.

Web Title : परभणी: रात में मोटरसाइकिल पर गांजा तस्करी करते दो गिरफ्तार।

Web Summary : परभणी पुलिस ने चारथाना के पास मोटरसाइकिल पर 5 किलो गांजा तस्करी करते दो लोगों को गिरफ्तार किया। जब्त किए गए ड्रग्स और मोटरसाइकिल की कीमत ₹1.6 लाख है। दोनों आरोपियों पर एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज।

Web Title : Parbhani: Two arrested for smuggling marijuana on a motorcycle at night.

Web Summary : Parbhani police arrested two individuals smuggling 5 kg of marijuana on a motorcycle near Charthana. The seized drugs and motorcycle are worth ₹1.6 lakh. Both accused are booked under the NDPS Act.