- राजन मंगरूळकर
परभणी : वसमत रोड भागातील बँकेतून काढलेले अडीच लाख रुपये घेऊन कार मालक फिर्यादी हे नारायण चाळकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नारळ पाणी पिण्यासाठी थांबले. वाहन आंदोलन मैदानाच्या बाजूला उभे करून सात ते आठ मिनिटात परत आले असता त्यांना वाहनाच्या चालकाच्या बाजूला असलेली काच फुटल्याचे आणि बॅग मधील अडीच लाख रुपये लंपास केल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी दुपारी ३.२० ते ३.२५ वाजेच्या दरम्यान घडली.
मनोहर सटवाजी घोरपडे (रा. रामकृष्ण नगर परभणी) यांनी डीसीबी बँक वसमत रोड येथून बुधवारी दुपारी पावणेतीन च्या सुमारास अडीच लाख रुपये काढले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी पुरवठादार म्हणून ते काम करतात. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध साहित्य खरेदीसाठी हे पैसे काढून ते नारायण चाळ येथे जात होते. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नारळ पाणी पिण्यासाठी ते आंदोलन मैदान येथे वाहन थांबवून गेले होते. वाहनाच्या चालक शेजारी असलेल्या जागेवर त्यांनी अडीच लाख रुपयांची बॅग ठेवली होती. बॅग चोरट्याने काही वेळातच काच फोडून लांबविली. यानंतर त्यांनी ही माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष आणि नवा मोंढा पोलीस ठाण्याला दिले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे, शंकर भोसले, पोलीस कर्मचारी अनिल कटारे, एस.डी.फड, गोरे, रंगनाथ दुधाटे, प्रवीण टाक यांच्यासह एलसीबी आणि विविध यंत्रणेचे कर्मचारी दाखल झाले होते.
सीसीटीव्ही दिसले दोन दुचाकीस्वारछत्रपती शिवाजी महाराज पुतळा आंदोलन मैदान येथे (एमएच २२ बीसी ७६३२) या क्रमांकाची कार मनोहर घोरपडे यांनी लावली होती. त्यांच्या कारचे एका बाजूची काच फोडून पैसे लंपास केल्याच्या प्रकरणात सीसीटीव्ही पाहणी पोलीस अधीक्षक कार्यालयात केली असता त्यात एका कॅमेरामध्ये दोन दुचाकी स्वार युनिकॉर्न वाहनावर आल्याचे व परिसरात आढळल्याचे दिसून आले.
Web Summary : In Parbhani, a car's window was smashed, and ₹2.5 lakh was stolen while the owner stopped for coconut water. The cash was withdrawn from a bank for official supplies. Police are investigating two suspects on a motorcycle using CCTV footage.
Web Summary : परभणी में नारियल पानी पीने के लिए रुकने पर कार का शीशा तोड़कर ढाई लाख रुपये चोरी हो गए। पीड़ित ने बैंक से पैसे निकाले थे। पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर मोटरसाइकिल सवार दो संदिग्धों की जांच कर रही है।