ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:12 IST2026-03-18T14:11:48+5:302026-03-18T14:12:27+5:30

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा 'सर्जिकल स्ट्राईक'; गंगाखेड-पालम रस्त्यावर गांजाची शेती उघड, ४२ किलो साठा जप्त

Parbhani Crime: Ganja Cultivation Found in Jowar Crop; Anti-Drug Task Force Seizes 42 kg Contraband | ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई

ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; गंगाखेडमध्ये टास्क फोर्सची कारवाई

परभणी : गंगाखेड-पालम रस्त्यावर नरळद शिवारातील एका शेतामध्ये ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची बाब अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या केलेल्या कारवाईत उघड झाली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. यामध्ये एकूण ४२ किलो १३० ग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत जक्केवाड यांनी फिर्याद दिली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नांदेड विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णहरी सपकाळ यांच्या पथकाला ही माहिती मिळाली होती. त्यावरून नांदेड येथील पथकातील पोलिस कर्मचारी पिराजी निळे, शंकर गायकवाड, संजय घुगे, शंकर कोस्केवाड, प्रशांत कोकंडे, तानाजी येळगे, गणेश जाधव, सुजित बेंबडे, जयश्री शिंदे यांनी गंगाखेड तालुक्यातील नरळद शिवारातील शेत गट क्रमांक ७२-२ येथे पंचासमक्ष छापा टाकला. 

यामध्ये नमूद ठिकाणी ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे समोर आले. याचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी चंदाबाई यादवराव काळे यांच्याविरोधात एनडीपीएसच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. एकूण ९ लाख २६ हजार तीनशे रुपये किमतीचा ४२ किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य वनस्पती ताब्यात बाळगल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत.

Web Title : ज्वार के खेत में गांजे की खेती का भंडाफोड़; ₹9 लाख जब्त

Web Summary : गंगाखेड में टास्क फोर्स ने ज्वार के खेत में उगाए गए 42 किलो गांजे को जब्त किया, जिसकी कीमत ₹9.26 लाख है। चंदा बाई काले पर मामला दर्ज; जांच जारी।

Web Title : Marijuana Cultivation in Sorghum Field Busted; ₹9 Lakh Seized

Web Summary : Task force in Gangakhed seized 42 kg of marijuana cultivated within a sorghum field, valued at ₹9.26 lakh. Chanda Bai Kale booked; investigation ongoing.