परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:26 IST2018-09-27T00:26:07+5:302018-09-27T00:26:50+5:30
ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ताडकळस (परभणी) : ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील माखणी येथे रेखा अंकूशराव आवरगंड या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. २५ सप्टेंबर रोजी राजेश कुुंडलिकराव जोंधळे (रा. नांदेड) या तोतया पत्रकारासह मनिषा बालाजी गंधलवार (रा. पेनूर ता. लोहा), विक्रम एकनाथ वाघमारे, शिवशंकर रमाकांत हिंगणे (रा.बसवेश्वर नगर, नांदेड) हे एम.एच. ०१-बी.टी. ७९४९ या कारने माखणी येथे आले. सरपंचपती अंकूशराव आवरगंड यांना भेटले. आपल्या ग्रामपंचायतीने अपंग निधी खर्च केला नाही. तसेच सरपंच मुख्यालयात राहत नाहीत. त्यामुळे चॅनलला बातमी दिली जाईल, ही बातमी न देण्यासाठी १० हजार रुपये द्या, अशी मागणी आवरगंड यांच्याकडे केली. आवरगंड यांना संशय आल्याने त्यांनी ताडकळस पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. त्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तेलंग, ससाणे, शेबेवाड, भालेराव तपास करीत आहेत.