परभणी : दुभाजकावर धडकली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:05 IST2019-06-14T00:05:02+5:302019-06-14T00:05:58+5:30
चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात दुभाजकाला धडकून एका कारला अपघात झाल्याची घटना १३ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मानवत रोडवरील नवीन उड्डाणपुलावर घडली़

परभणी : दुभाजकावर धडकली कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात दुभाजकाला धडकून एका कारलाअपघात झाल्याची घटना १३ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मानवत रोडवरील नवीन उड्डाणपुलावर घडली़
परभणी येथील राजेभाऊ दादाराव रेंगे हे एमएच ३१ ईयू-०६९९ या क्रमांकाच्या कारने पुण्याला जात होते़ ही कार मानवत रोडजवळ आली असता विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता़ या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात कार दुभाजकावर जाऊन धडकली़ या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही़