परभणी : सोयाबीन जाळले; दीड लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:38 IST2018-10-21T00:37:59+5:302018-10-21T00:38:41+5:30
येथून जवळच असलेल्या मुडा येथील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे सोयाबीन जळाल्याची घटना १८ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़

परभणी : सोयाबीन जाळले; दीड लाखाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : येथून जवळच असलेल्या मुडा येथील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे सोयाबीन जळाल्याची घटना १८ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़
मुडा येथील शेतकरी बालासाहेब कोरडे यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन कापून ठेवले होते़ १८ आॅक्टोबर रोजी रात्री गावातील आरोपी रामभाऊ कºहाळे याने हे सोयाबीन सुडबुद्धीने जाळल्याची तक्रार कोरडे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे़
आगीमध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून बोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवाड, जमादार बी़डी़ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़