परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:34 IST2018-09-23T00:34:03+5:302018-09-23T00:34:47+5:30

पुरात वाहून गेलेल्या येसेगाव येथील एक ५५ वर्षीय शेतकºयाचा मृतदेह २० सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील कडसावंगी शिवारात आढळून आला.

Parbhani: The body of a farmer was found in Yesegaon | परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): पुरात वाहून गेलेल्या येसेगाव येथील एक ५५ वर्षीय शेतकºयाचा मृतदेह २० सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील कडसावंगी शिवारात आढळून आला.
येसेगाव येथील इंदर चिमाजी शेळके (वय ५५) हे १७ सप्टेंबर रोजी शेतातून घरी येत असताना बाण नदीच्या पुरात वाहून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. २० सप्टेंबर रोजी कडसावंगी शिवारातील बाण नदीच्या पात्रात इंदर शेळके यांचा मृतदेह आढळून आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोराळकर यांनी शवविच्छेदन केले. यावेळी उपसरपंच रामा फाटे, विलास अंबुरे, गुलाबराव शेळके, अमोल संगेकर, के.जी. पतंगे, संतोष सानप आदींची उपस्थिती होती.

Web Title: Parbhani: The body of a farmer was found in Yesegaon