परभणी : दुचाकी-आॅटो अपघात; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:04 IST2019-05-26T00:03:49+5:302019-05-26T00:04:03+5:30
तालुक्यातील करम पाटीजवळ दुचाकी व लोडिंग आॅटो यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

परभणी : दुचाकी-आॅटो अपघात; दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील करम पाटीजवळ दुचाकी व लोडिंग आॅटो यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
गंगाखेड येथून एम.एच.११- जेएफ ७४४३ क्रमांकाचा लोडिंग आॅटो परळीकडे जात होता. तर परळी येथून गंगाखेडकडे एम.एच.२२- क्यू ६०३१ ही मोटारसायकल येत होती. करम पाटीजवळ या दोन्ही वाहनांचा शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला व लोडिंग आॅटो रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर जावून आदळला. या अपघातात दुचाकीवरील हनुमान ज्ञानोबा काटकर (३३, रा.खळी ता. गंगाखेड) याच्या हाताला, पायाला, कंबरेला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच आॅटोचालक शेख मोईन शेख गुलाम कादीर (३६, रा.औरंगाबाद) याला किरकोळ दुखापत झाली. दोन्ही जखमींना करम येथील ग्रामस्थांनी व इतर वाहनचालकांनी परळी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुचाकी चालक काटकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.