शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

परभणी : पाच लाख हेक्टर क्षेत्रावर बहरली पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:57 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ या क्षेत्रावर १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीही केली़ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग व उडीद या पिकांनी तग धरली असून ही पिके आता चांगलीच बहरात आली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ या क्षेत्रावर १०० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीही केली़ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग व उडीद या पिकांनी तग धरली असून ही पिके आता चांगलीच बहरात आली आहेत़तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे २०१९-२० हा खरीप हंगाम तरी शेतकऱ्यांना उभारी देणारा ठरेल, अशी अपेक्षा आह; परंतु, जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यांत पाऊस खंड स्वरुपात झाला़ त्यामुळे याहीवर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी शेतकºयांच्या हातून जातो की काय? अशी शंका शेतकºयांमध्ये निर्माण झाली होती़ परंतु, ३१ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस झाला़ त्यामुळे खरीप हंगामातील पिके सद्यस्थितीत चांगली बहरली आहेत़ त्यामुळे पीक परिस्थिती अशीच राहिली तर तीन वर्षाचा दुष्काळ धुवून शेतकºयांना आर्थिक उभारी देणारा हा खरीप हंगाम ठरणार आहे़जिल्ह्यामध्ये ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे़ यामध्ये २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे़त्यानंतर १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे नगदी पिके म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक चांगले बहरले आहे़ त्याचबरोबर कडधान्य पिके ९ हजार ९१, अन्नधान्याची पिके १२५१ हेक्टर, तीळ पीक १० हेक्टर, सूर्यफूल २ हेक्टर अशी पिकांची लागवड झालेली आहे़ त्यामुळे सध्या जिल्ह्यातील शेतकरी समाधानी असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, ४४९ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख नद्या खळाळल्या नाहीत़ त्यामुळे पीक परिस्थिती चांगली असली तरी पाणीसाठा मात्र झालेला नाही़येलदरी, निम्न दुधना मृत साठ्यातच४यावर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरी पावसाच्या तुलने जिल्ह्यामध्ये ५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ हा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे़ परिणामी दोन वर्षांपासून कोरडे पडलेले प्रकल्प निम्मा पावसाळा संपल्यानंतरही कोरडेच आहे़ जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पावर परभणी जिल्ह्यासह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे़४९३४ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये १२४ दलघमी पाणी मृतसाठ्यात साठविले जाते आणि त्यापुढील पाणीसाठा जिवंत साठा म्हणून नोंद घेतला जातो़ मात्र १५ सप्टेंबरपर्यंत या प्रकल्पात केवळ १२२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्याची टककेवारी शून्य टक्के एवढी आहे़ तर दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात आहे़ या प्रकल्पावर सेलू शहरासह इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे़४सध्या प्रकल्पात जिवंत पाणीसाठा नसल्याने आगामी काळात या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत़ त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील करपरा आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही़ मासोळी प्रकल्पात सद्यस्थितीला १९.०८ दलघमी (४५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ तर करपरा प्रकल्पामध्ये अद्यापही जीवंत पाणीसाठा झालेला नाही़४दोन आठवड्यांपूर्वी जायकवाडी प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीवर बांधलेल्या मुदगल, ढालेगाव, डिग्रस या बंधाºयात पिण्यासाठी पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे काही अंशी या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी भविष्यात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पावरच अवलंबून राहावे लागणार आहे़साडेतीन महिन्यांत ४४९ मिमी पाऊस४जिल्हा प्रशासनाच्या तालुकानिहाय पर्जन्यमान अहवालानुसार जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबरपर्यंत ४४९़६९ मिमी पाऊस झाला आहे़ यामध्ये परभणी तालुक्यात ३७९़८९ मिमी, पालम ४१०, पूर्णा ५४९़४०, गंगाखेड ४६९, सोनपेठ ४५५, सेलू ४०४़८०, पाथरी ४६०, जिंतूर ४३३़५० तर मानवत तालुक्यात ४८५ मिमी पाऊस झाला आहे़ विशेष म्हणजे हा पाऊस आतापर्यंत केवळ पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे़४जिल्ह्याची सरासरी ७७४़६२ मिमी एवढी आहे़ १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ६३१़३४ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे़ परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे केवळ पिके धार्जिणा पाऊस पडल्याने जिल्ह्याला पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने उलटले तरीही दमदार पावसाची अपेक्षा अजूनही आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी