परभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षक भरतीस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:06 IST2019-07-29T00:05:45+5:302019-07-29T00:06:20+5:30
अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

परभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षक भरतीस टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
परभणीजिल्हा परिषदेत शिक्षकांची २५९ पदे रिक्त आहेत. तसेच अनुकंपा धारकांची यादीही जाहीर झाली आहे. रिक्त पदांपैकी १० टक्के पदे अनुकंपाधारकांतून भरण्याचे शासनाचे आदेश असून, परभणी जिल्हा परिषदेत मात्र या आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे, राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करुन त्याची प्रसिद्धीही केली जात असताना परभणी जिल्हा परिषद प्रशासन मात्र अनुकंपा तत्त्वावर भरती करीत नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
दोन दिवसांपूर्वी येथील अनुकंपाधारकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १० जून २०१९ रोजी शासन आदेश काढला असून, त्यात अनुकंपा नियुक्तीसाठी पदभरतीची मर्यादा निश्चित केली आहे. सरळ सेवेने पदभरती करताना प्रति वर्षी रिक्त होणाºया पदांपैकी १० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरावित, असे स्पष्टपणे या आदेशात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, याच आदेशाचा आधार घेत अकोला, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अनुकंपाधारकांना १० टक्के कोट्यातून शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीही देण्यात आली आहे.
२५ पदे अनुकंपातून भरण्याची मागणी
४परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवकांची २५९ पदे रिक्त असून,१० टक्केनुसार २५ पदे अनुकंपा तत्त्वाने भरण्यात यावीत.
४अनुकंपाधारकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षण सेवक पदावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी अनुकंपाधारकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
४मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर साईप्रसाद कांगणे, प्रतिक आचणे, महेश गाजरे, संदीप पवार, अमोल माटकर, ज्ञानेश्वर सावंत आदींची नावे आहेत.