परभणी : आॅटोमोबाईल दुकान आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:47 IST2019-06-16T23:47:29+5:302019-06-16T23:47:49+5:30
शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़

परभणी : आॅटोमोबाईल दुकान आगीत खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): शहरातील रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील हॉटेल व आॅटोमोबाईलचे दुकान आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे़ ही घटना १६ जून रोजी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास घडली़
रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील बसस्थानकानजिक सुनील जाधव यांच्या जागेतील आॅटोमोबाईल्स तसेच हॉटेल व राहत्या घरास अचानक आग लागल्याने या आगीत हॉटेलसह आॅटोमोबाईल्स दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले़
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही़ आग विझविण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आली़ तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी या आगीचा आढावा घेत पंचनामा केला़ दरम्यान, सकाळी ही आग लागल्याने आग पाहण्यासाठी या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़