शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:47 AM

पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाईने डोके वर काढल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या समस्येने होरपळून निघाला होता़ टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी यावर्षी प्रथमच जिल्हा प्रशासनाने नऊ महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता़ जून अखेरपर्यंत प्रशासनाला पाणीटंचाईच्या कामांवर भर द्यावा लागला़ पावसाचे वेळेत आगमन झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीतही फारशी वाढ झाली नसल्याने अनेक गावांत टंचाईचे संकट कायम आह़े़ जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या कामांसाठी दोन वेळा मुदत वाढ दिली आहे़ त्यानुसार ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत़ जून महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ होतो़ मात्र संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ६० टक्केच पाऊस झाला़ परिणामी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागल्या़जून महिन्यात जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि विशेष नळ योजना दुरुस्तीच्या ९ कामांना मंजुरी दिली आहे़एकूण ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांची ही कामे असून, जिल्ह्यात टंचाई जाणवणाऱ्या भागात या कामांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परभणी तालुक्यातील भोगाव येथे १ लाख ६८ हजार ६०० रुपये खर्चाच्या नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला ११ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली़ तसेच पेडगाव येथील २ लाख ६० हजार रुपये, सिंगणापूर येथील १ लाख ७८ हजार २०० रुपये, इस्माईलपूर येथील १ लाख ७ हजार २००, नांदापूर येथील १ लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या कामांना जून महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे ६ लाख ३१ हजार ४०० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला ९ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ याच तालुक्यातील गौर येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने १५ लाख ६९ हजार ४४० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला जिल्हा प्रशासनाने १२ जून रोजी मंजुरी दिली आहे तर मुंबर येथे २ लाख ४८ हजार ८०० रुपये खर्चाच्या कामालाही १५ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे़ पूर्णा तालुक्यातील वाईलासिना येथे ३ लाख ८ हजार २०० रुपये खर्चाच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामाला १५ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़जून महिन्यात शक्यतो पाणीटंचाई शिथील होते़ मात्र यावर्षी पाऊस झाला नसल्याने जून महिन्यातही टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी लागली आहेत़ विशेष म्हणजे, जुलै महिना अर्धा सरला तरी पाऊस नसल्याने जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग अजूनही पाणीटंचाई निवारणाचीच कामे प्राधान्याने करीत आहे़ त्यावरून जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे़१०० गावांमध्ये टंचाई निवारणाची कामे४जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील १०९ गावांमध्ये प्रशासनाने नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ या कामांपैकी अनेक कामे पूर्णही झाली आहेत़ त्यामुळे अनेक गावांमधील पाणीटंचाई शिथील झाली असली तरी संपूर्ण उन्हाळ्यात नळ योजना दुरुस्तीच्या कामांमधून प्रशासनाने पाणीटंचाई निवारणाचा प्रयत्न केला आहे़४सेलू तालुक्यातील १३, मानवत तालुक्यातील १२, पालम तालुक्यातील ६, पाथरी तालुक्यातील ६, जिंतूर तालुक्यातील ११, गंगाखेड तालुक्यातील ६, सोनपेठ तालुक्यातील २, परभणी तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील ६ अशा १०९ गावांमध्ये आतापर्यंत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना आणि नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहेत़पावसाची प्रतीक्षा कायम४जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असला तरी हा पाऊस समाधानकारक नाही़ या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ परंतु, भूजल पातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे़४जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक असून, या प्रकल्पात पाणीसाठा जमा होण्यासाठी वाहवणी पाऊस होणे आवश्यक आहे़४सध्या होत असलेला पाऊस अल्प स्वरुपाचा असून, या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीतही वाढ होत नसल्याने जिल्हावासियांना मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाई