शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:22 IST

जिल्हा बँकेच्या प्रारुप मतदार यादीचा अंतीम कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जाहीर केला आहे़ त्यानुसार १३ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा बँकेच्या प्रारुप मतदार यादीचा अंतीम कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जाहीर केला आहे़ त्यानुसार १३ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्याचे आदेश दिल्यानंतर या संदर्भातील प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे़ जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सभासद संस्थांचे ठराव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या सुचनेनुसार ३१ जानेवारीपर्यंत मागविण्यात आले होते; परंतु, या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती़ ती स्थगिती न्यायालयाच्या आदेशाने उठविल्यानंतर थांबलेल्या संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव मागणीसाठी २० ते २७ फेब्रुवारी असा सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे़ २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी प्राप्त संस्था प्रतिनिधीचे ठराव जिल्हा बँकेस द्यायचे आहेत़ त्यानंतर बँकेने प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना ५ मार्च रोजी सादर करावयाची आहे़ १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी ही प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत़ या यादीवर २६ मार्च पर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत़ ७ एप्रिल रोजी आक्षेपांवर निर्णय दिला जाणार आहे़ त्यानंतर १३ एप्रिल रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात १८ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकElectionनिवडणूक